भैरवनाथ आधार प्रतिष्ठान व शिवकृपा सर्जिकल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य रोग निदान शिबीर संपन्न 

1 min read

अकोले दि.११:- चास (ता.अकोले) येथे नागरिकांसाठी भैरवनाथ आधार प्रतिष्ठान चास व शिवकृपा सर्जिकल हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यामाने भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच यावेळी रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते. अनेक रक्तदात्यांनी या वेळी रक्तदान केले.

यासाठी अर्पण ब्लड बँक संगमनेर यांचा मोठं सहकार्य लाभलं. हे शिबिर गुरुवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात १२५ नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले. शिबिरासाठी सुनील शेळके, भैरवनाथ आधार प्रतिष्ठान, ग्रामपंचायत चास, समस्त ग्रामस्थ व तरुण मित्रमंडळाच मोठे सहकार्य लाभल.

या शिबिरात मूळव्याध, मूत्रविकार, अपघात विभाग, पोट विकार, अपेंडिक्स, हर्निया अशा विविध आजाराचे निदान व उपचार करण्यात आले. डॉ. शिवाजी खेमनर (एम एस जनरल सर्जन) यांनी या शिबिरात मोफत उपचार केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे