शेताला पाणी देताना भर दुपारी शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; मंचर येथे उपचार सुरू
1 min read
आणे दि.५:- आणे (ता.जुन्नर) येथे मक्याच्याला पाणी देत असताना शेतात दबा धरलेल्या बिबट्याने भर दुपारी किरण तुळशीराम दाते (वय ३५) शेतकऱ्यावर झडप घातली. या हल्यात शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला झाल्यावर असून मोठ्या शिताफीने शेतकऱ्याने प्रतिकार करत बिबट्याला पळवून लावले. ही घटना शनिवारी दुपारी १२ च्या दरम्यान आणे (ता.जुन्नर) शिवारात नळावणे रस्त्यावर घडली. मदतीसाठी आरडा-ओरडा केला. जवळच शेतात काम करत असलेले शेतकरी मदतीला धावले. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते यांनी जखमी किरणला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.