शिरूर तालुक्यात एकाच दिवसात तिघांचा गळफास
1 min read
शिरूर दि. १६:- शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नियमित आत्म्हत्याच्या घटना घडत असताना वढू बुद्रुक, कोंढापुरी शिक्रापूर येथे एकाच दिवसात तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.
वढू बुद्रुक येथे मंगेश रंगनाथ भंडारे (वय ३७, रा. वढू बुद्रुक), तर कोंढापुरी येथे गोविंद बोकरराव दुधारे (वय ६०, रा. कोंढापुरी, मूळ रा. गोळेगाव ता. पूर्णा जि. परभणी) आणि शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथे विष्णू शेषराव चव्हाण (वय ४०, रा. बजरंगवाडी शिक्रापूर, मूळ रा. बेचखेडा, जि. यवतमाळ)
या तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत. मात्र, कोणाच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तिघांच्या पालकांनी शिक्रापूर पोलिसांत खबर दिली आहे. आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हवालदार दिलीप मोरे करीत आहेत.