अफगाणिस्तानकडून इंग्लंडला पराभवाचा धक्का

1 min read

लाहोर दि.२७:- येथे झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठव्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा संघ ८ धावांनी पराभूत झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  या पराभवामुळे इंग्लंडचा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मधील प्रवास संपला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानने उपांत्यफेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अफगाणिस्तानने ५० षटकांत ७ गडी गमावून ३२५ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने सर्वाधिक १७७ धावा केल्या. इंग्लंडचा संपूर्ण संघ ४९.५ षटकांत ३१७ धावाच जमवू शकला. अफगाणिस्तानच्या अझमतुल्लाह उमरझाईने ५ फलंदाज बाद केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे