गांजाची वाहतूक करणारे दोघे ताब्यात; तोफखाना पोलिसांची कारवाई

1 min read

अहिल्यानगर दि.१७:- तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्री करणारे दोघे तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साडेआठ किलो गांजा असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.संदीप राजू मालुंजकर (वय २५, रा. संजयगांधी नगर संगमनेर), सचिन प्रताप कतारी (वय २६, रा. संगमनेर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार सोनानगर परिसरात दोन व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे