आनंदाची बातमी! लाडकी बहिण योजनेसाठी ॲप वरून घरबसल्या करू शकता रजिस्ट्रेशन; जाणून घ्या प्रोसेस

1 min read

मुंबई दि.३:- महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

तलाठी कार्यालय, सेतू ते नागरी सुविधा केंद्रांमध्ये महिलांची गर्दी पहायला मिळत आहे. अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करताना महिला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

हा त्रास कमी व्हावा म्हणून लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. यामुळे लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करणे अधिक सोईस्कर होणार आहे. आता या ॲप वरून कशाप्रकारे अर्ज करू शकता

त्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया… या योजनेसाठी अनेक मार्गांनी तुम्ही तुमचा अर्ज दाखल करू शकता. ऑफलाईन पद्धतीने तहसील कार्यालयात जाऊन किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीने किंवा सेतू कार्यालयात हा अर्ज दाखल करता येतो.

ज्या महिलांना मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठीही राज्य सरकारने नारीशक्ती दूत नावाच्या ॲपचा वापर करण्याचा पर्याय दिलेला आहे. महिलेच्या डोक्यावर फेटा असं चित्र असलेलं ‘नारीशक्ती दूत’ ॲप डाऊनलोड करून अर्ज करू शकता.

अर्जदार महिलांना नारीशक्ती दूत ॲपवर सर्व प्रथम प्रोफाईल तयार करावे लागेल. त्यानंतर कॅटेगरीची निवड करावी लागेल.त्यानंतर ‘लाडली बहीण योजना’ यावर क्लिक करून नाव, पत्ता, बँक खात्याचे डिटेल्स आणि इतर माहिती भरावी लागेल.

सोबत अर्जदार महिलेचा फोटोही जोडायचा आहे. यानंतर या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जोडून तुम्ही तुमचा अर्ज पूर्ण करू शकता. अपडेट करण्याचे काम चालू असून दोन दिवसात हे ॲप पूर्ववत होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे