जुन्नरचे ६ हजार हेक्टर सिंचनाखाली येणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन; ३१३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

1 min read

आळेफाटा दि.२६:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील २१ अवर्षण प्रवण गावांसाठी आता बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या शुक्रवारी (दि.२५) दुसऱ्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या कामासाठी राज्य सरकारने ३१३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दुसऱ्या टप्याला आमदार अतुल बेनके यांच्या पाठपुराव्यामुळे २८ वर्षांनंतर शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर ६ हजार ३७२ हेक्टर हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खाजदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे,माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, आळे गावचे सरपंच प्रीतम काळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पूर्व भागातील २१ गावे
सिंचनाखाली येणार

चिल्हेवाडी, पाचघरवाडी, आंबेगव्हाण, रोहोकडी, ओतूर, डुंबरवाडी, खामुंडी, गायमुखवाडी, पिंपरी पेंढार, जांभूळपट, नवलेवाडी, पादीरवाडी, वडगाव आनंद,
आळेफाटा, आळे, संतवाडी, कोळवाडी, राजुरी, गुंजाळवाडी, बेल्हे, बांगरवाडी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे