नगर -कल्याण महामार्गावर इको गाडीला अपघात; दोन गंभीर जखमी

1 min read

बेल्हे दि.१ :- बेल्हे (ता.जुन्नर) आज शनिवार दि.१ पहाटे चार वाजता नगर- कल्याण महामार्गावर बेल्हे जवळ (MH 04.KR 2320) नगर वरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या या इको गाडीचा अपघात झाला. झोपेत चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

ईको गाडीतील लहान मुलगा,दोन महिला,२ पुरुष असे पाच प्रवाशी प्रवास करत होते.दोन महिला गंभीर असून दोन पुरुष व लहान मुलगा किरकोळ जखमी आहेत.

प्रवाशांची नावे समजली नसून सर्व प्रवाशी भिवंडी येथील असल्याची माहिती मिळाली आहे. पहाटे चारच्या सुमारास अपघाताचा आवाज आल्याने स्थानिक ग्रामस्थ सावकार पिंगट, भिवसेन पिंगट, निखिल गाढवे, संजय पिंगट, सचिन पिंगट, हरकू पिंगट यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले.जखमींना आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले तर गंभीर जखमी झालेल्या महिलांना पुढील उपचारासाठी भिवंडी येथे पाठविण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे